...म्हणून गौराईला दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण काय जाणून घ्या!

...म्हणून गौराईला दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण काय जाणून घ्या!

कोकणातल्या गणेशोत्सवात गौरी पूजनाचा दिवस महत्वाचा असतो. कारण गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

कोकणातल्या गणेशोत्सवात गौरी पूजनाचा दिवस महत्वाचा असतो. कारण गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो. पण गौरी पूजनाच्या दिवशी कोकणातील मांसाहार करणाऱ्या अनेक घरात आज तिखटा सण साजरा होतो. गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेकजण मांसाहार सोडतात. मग हा मांसाहाराच उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो. घराघरात गौरीचे आगमन झाले की पूजनाच्या दिवशी माहेरवाशिणी गौरीला काही ठिकाणी तिखट मांसाहाराचा नेवैद्य दाखवला जातो. माहेरवाशीण असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमानी आणि सारेच हा "तिखटा" सण जोरात साजरा करतात.

काही भागात गौरीला मटण, कोंबडीवडे, अगदी चिंबोरी, मच्छीचं नैवेद्य दाखवलं जातं. हिंदू धर्मात देवाला मासमच्छी वर्जीत असतं. अशामध्ये देवाच्या कामात गौराईंना नॉनव्हेजचं जेवण हे अनेकांना समजतं नाही. गौराईंना नॉनव्हेज नैवेद्य का दिला जातो. जाणून घ्या पौराणिक कथा.

पौराणिक कथेनुसार माता पार्वती गौरीच्या रुपात माहेरीपणाला येते म्हणून तीन दिवस तिचे लाड केले जातात. त्यामुळे माहेरी आलेल्या पार्वती मातेला भूतगणांना मांसाहार मिळत नाही. म्हणून तिला तिखाटाचं नैवेद्य दाखवला जातो. असं म्हणतात की हा नैवेद्य पार्वती मातेसमोर ठेवला असला तरी तो भूतगणांचा मान म्हणजे रक्षकांसाठी ठेवला गेला आहे. गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही.

शंकराचं भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली.तर कोळी लोक चिंबोरी, मच्छीचं नैवेद्य दाखवतात. विशेष म्हणजे गपतीला नॉनव्हेज चालत नाही अशा परिस्थितीत गणपतीला परदा करुन हा नैवेद्य दाखवला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com